Maharashtra Weather Today : राज्यभरात मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका काहीसा कमी होताना दिसत आहे. यातच आता ऐन हिवाळ्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्याचे पाहायला मिळाले. ठाणे, नंदूरबार आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. तर पुणे, मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासूनच आकाश ढगाळ आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. अवकाळी पावसामुळे आणि गेल्या 24 तासांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे राज्यातून थंडी गायब झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला असून किमान तापमानात वाढ झाली असून हुडहुडी भरवणारा गारठा सध्या ओसरला आहे. पुढील २४ तास असेच वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maharashtra Weather Today : राज्यातून थंडी गायब Bhagat Singh Koshyari : पुरस्कार की जखमेवर मीठ? कोश्यारींना पद्मभूषण जाहीर होताच राजकारण तापलं; ‘या’ जुन्या वक्तव्यांचा भडका दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज सकाळी हलके धुके जाणवण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार असून पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, काही ठिकाणी तुरळक स्वरूपात हलक्या सरी पडू शकतात. थंडीचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि परिसरात आज हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमानात हळूहळू वाढ होत राहील आणि थंडीचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. Yuzvendra Chahal Statement : रोहितचा ‘हा’ कानमंत्र सूर्या ब्रिगेडसाठी ठरतोय वरदान; चहलच्या विधानाने क्रिकेट विश्वात चर्चा ठाणे, नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाची हजेरी राज्यातील विविध भागांत हवामानात अचानक बदल झाल्याने अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात आज अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. रायगड जिल्ह्यातही पहाटे चार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर दुसरीकडे, नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शहादा शहरासह परिसरात अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली, तर जिल्ह्याच्या अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या आहेत. हेही वाचा : Government job : कामाची बातमी.! ‘या’ सरकारी विभागात चालू आहे सर्वात मोठी भरती, असा करा अर्ज….