Maharashtra Vidhan Sabha Election 2024 वाशिम : जर महायुतीमध्ये युतीधर्मा पाळला गेला नाही तर इतर दोन मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवाराचे काम आम्ही करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे युतीमध्ये आता नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये बंडखोरी झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेतून बंडखोरी बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याविषयी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन फक्त युतीधर्म आम्हीच पाळायचा का? असा सवाल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
रिसोड विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे अनंतराव देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता शिवसेनेच्या शिंदे गटातून आक्रमक पवित्रा घेऊन भाजपच्या नेत्याकडे याबद्दल बंडखोरी करणाऱ्याला आपण समज द्यावी आणि अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडावे, अशी विनंती करणार असल्याचे यावेळेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
रिसोड विधानसभा मतदारसंघ 2009 विधानसभा निवडणूक –
रिसोड विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये सुभाष झनक हे 51,234 मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे बंडखोर माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा पराभव केला होता.
वाशीम जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ –
वाशीम जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. वाशीम, कारंजा, रिसोड यापैकी गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये वाशीम, कारंजा मतदारसंघात भाजपचे उमेदवार जिंकून आले. तर रिसोड मतदारसंघात काँग्रेस आमदार निवडून आले आहेत.