महाराष्ट्र हादरला! कोरोनामुळे एकाच दिवसात २३३ मृत्यू

मुंबई – देशातील कोरोना विषाणूचा प्रमुख हॉटस्पॉट ठरलेल्या महाराष्ट्रात आज ७,९७५ कोरोनाग्रस्तांची भर पडली. आज सापडलेल्या नव्या बाधितांमुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २,७५,६४० इतका झाला आहे.

आज दिवसभरात कोरोनामुळे २३३ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून एकूण मृत्यूंची संख्या ११ हजाराच्या नजीक पोहचली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १०,९२८ कोरोनाग्रस्त दगावले आहेत.

याबाबत राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आज ३,६०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून यामुळे एकूण कोरोनमुक्त रुग्णांचा आकडा १,५२,३०६ इतका झाला आहे. सद्यस्थितीत राज्यात १.११,८०१ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.