मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
“माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 20, 2021
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. सध्या ते मुंबईतील सेंट जाॅर्ज शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.