नागपूर – परदेशातील उद्योगांद्वारे भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे. आर्थिक वर्ष 2022-23च्या शेवटच्या तिमाहीत महाराष्ट्र हे राज्य इतर सर्व राज्यांच्या पुढे गेले आहे. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिली.
फडणवीस यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, पुन्हा एकदा एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबर ! देशातल्या परकीय गुंतवणुकीत टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
फडणवीस यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, होय, पुन्हा एकदा एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबर ! आम्ही सातत्याने सांगत होतो की खंडणी, वसुली, भ्रष्टाचाराचा महाविकास आघाडीचा काळ संपवून राज्यात नवे सरकार आले आहे आणि आता महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ वाढणार आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1 होणार… डीआयपीपीने जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीचा जो अहवाल जारी केला आहे, त्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र सर्वाधिक एफडीआय (परकीय गुंतवणूक) प्राप्त करणारे राज्य ठरले आहे. 29 टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून, कर्नाटक 24 टक्क्यांसह दुसऱ्या तर गुजरात 17 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, महाराष्ट्र उद्योगात पहिल्या नंबरवर होता आणि पुन्हा आम्ही महाराष्ट्राला पहिल्या नंबरवर आणू, असे फडणवीस काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते. या भषणाचा काही भाग, तसेच वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत परकीय गुंतवणुकीबद्दल त्यांनी केलेले दावे ट्विटरवर शेअर केले आहेत.