सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला!

पुण्यात उच्चांकी 43 अंश से. तापमानाची नोंद

पुणे – सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहरातील कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. हे तापमान आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, नगर, सोलापूर आणि जळगाव, मालेगाव, सातारा आणि नाशिक शहरातील कमाल तापमनात लक्षणीय वाढ झाली आहे.

शहरात यावर्षी सूर्यनारायण चांगलेच तापले आहेत. मागील आठ दिवसांपासून दररोज कमाल तापमान अर्धा ते एक अंशांनी वाढ होत आहे. रविवारी (दि.28) शहरातील कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. 120 वर्षांपूर्वी 43.3 हा सर्वाधिक उच्चांक असून, पुढील दोन दिवस असेच तापमान राहिले, तर तो उच्चांक मोडण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, गेल्या 24 तासात राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट होती. मराठवाड्याने एप्रिलमधील उच्चांक मोडत परभणी, चंद्रपूर आणि अकोला येथे सर्वाधिक 47.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश शहरातील कमाल तापमान 44 ते 45 अंशाच्या पुढे गेल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ चांगला भाजून निघत आहे. पुढील दोन दिवस (दि. 29, 30) विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाने दिली.

राज्यातील काही प्रमुख शहरातील कमाल तापमान
परभणी, चंद्रपूर आणि अकोला 47.2, ब्रह्मपुरी 46.3, वर्धा 45.7, अमरावती 45.8, यवतमाळ 45.5, जळगाव 45.4, अहमदनगर आणि बीड 45.1, नागपूर 44.9, नांदेड 44.6, सोलापूर 44.3, मालेगाव 44.2, बुलढाणा 44, औरंगाबाद आणि गोंदिया 43.6, पुणे आणि उस्मानाबाद 43, नाशिक 42.8, सातारा 42.1, सांगली 40.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.