डीएलएडच्या 25 हजार जागा राहणार रिक्‍त

पुणे – प्राथमिक शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या डीएलएड (डीएड) अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष प्रवेश अंतिम टप्प्यात आले आहेत. अखेरच्या फेरीनुसार दि. 31 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचा कालावधी आहे. डीटीएडचे शासकीय कोट्यातील 36 हजार 173 प्रवेश क्षमता असून, त्यापैकी शुक्रवारपर्यंत 10 हजार 306 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे शासकीय कोट्यातीलच 25 हजार डीएलएडचे प्रवेश रिक्‍त राहणार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

गेल्या पाच-सहा वर्षांपासून डीएलएड अभ्यासक्रमाला उतरती कळा लागली आहे. सन 2012 पासून शिक्षक भरती बंद आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षक होण्यासाठी डीएलएड उत्तीर्ण व्हावे लागेल, इतके पुरेसे राहिले नाही. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि नव्याने अभियोग्यता चाचणी परीक्षा या दोन्ही परीक्षांना सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर शिक्षकाची नोकरी लागेल, या विषयी शाश्‍वती नाही. त्यामुळे डीटीएड प्रवेशाकडे विद्यार्थी पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून विद्यार्थी अभावी शिक्षण संस्थांना डीएड अभ्यासक्रम बंद करण्याची वेळ येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात डीएलएड प्रवेशाची क्षमता एकूण 55 हजार 644 एवढी आहे. त्यातील 36 हजार 163 जागा शासकीय कोट्यातील, तर उर्वरित 19 हजार 481 प्रवेश व्यवस्थापन कोट्यातील आहेत. शासकीय कोट्यातील आतापर्यंत 10 हजार 306 प्रवेश झाले आहेत. व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश संस्थास्तरावर होत असून, त्याची आकडेवारी अद्याप उपलब्ध नसल्याचे डीएलएड प्रवेश समितीकडून सांगण्यात आले आहे.

गुणवत्ताधारक उमेदवारांना नोकरी मिळण्याचे चिन्हे

सध्या राज्यात 847 अध्यापक विद्यालये आहेत. गतवर्षीही दहा हजारांच्या सुमारास डीटीएडचे प्रवेश झाले होते. यंदाही तीच स्थिती दिसून येत आहे. मात्र सध्या “पवित्र’ पोर्टलवरून खासगी शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे गुणवत्ताधारक डीटीएड उमेदवारांना शिक्षकांची नोकरी मिळण्याची आशादायक चिन्हे दिसून येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)