महाराष्ट्र, तामिळनाडूत देशातील निम्मे बाधित

अन्य आठ राज्यांत 36 टक्के बाधित; मृत्यूदर मात्र सर्वात कमी

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि तामिळनाडूत देशातील निम्मे सक्रिय बाधित आहेत. तर 86 टक्के सक्रिय करोना बाधित केवळ 10 राज्यांमध्ये आहेत, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली.
महाराष्ट्रात एक लाख, पाच हजार 935 सक्रिय बाधित आहेत. तर एकूण बाधितांची संख्या दोन लाख 60 हजार 924 आहे.

तामिळनाडूत सक्रिय बाधितांची संख्या 48 हजार 199 असून एकूण बाधितांची संख्या एक लाख 42 हजार 798 आहे. सक्रिय बाधितांपैकी 36 टक्के हे कर्नाटक, दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा, प. बंगाल, गुजरात आणि आसाममध्ये आहेत.

सध्या तीन लाख 11 हजार 565 सक्रिय बाधित देशांत असून एकूण सक्रिय बाधितांची संख्या पाच लाख 71 हजार 459 आहे. 12जुलै रोजी बाधित बरे होण्याचे प्रमाण 63.02 टक्के आहे. 20 राज्यांमध्ये हे प्रमाण या पेक्षा अधिक आहे. मार्च महिन्यात करोना बाधित वाढीचा वेग 31 टक्के होता. तो 31 मे रोजी 4.82 टक्‍क्‍यांवर आला. तर जुलै 12 रोजी तो 3.24 टक्‍क्‍यांवर आला.

भारतात करोनाच्या चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याचा आरोप केला जात आहे. भारतात दहा लाख लोकांमागे 657 चाचण्या केल्या जातात. तर जागतिक पातळीवर हे प्रमाण 1638 आहे. देशांतील करोनाचा मृत्यू दर जागतिक पातळीवर दहा लाख लोकांमागे 73 आहे. तो भारतात 17.2 आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या निकषांपेक्षा भारतातील 22 राज्यात अधिक चाचण्या केल्या जात असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.