एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच; एसटी महामंडळात पुन्हा खळबळ

पंढरपूर- एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच असून आज पंढरपूर आगारातील कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. गेल्या महिनाभरात राज्य परिवहन महामंडळात चार कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

दशरथ गिड्डे असे आत्महत्या केलेल्या कर्मरचाऱ्याचे नाव असून ते पंढरपूर येथील एसटी महामंडळाच्या यांत्रिकी विभागात कार्यरत हाेते. दरम्यान गिड्डे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

गिड्डे यांच्या मागे पत्नी व दोन लहान मुले आहेत. त्यांचे मूळ गाव मोहोळ हे आहे. गिड्डे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते असे सांगितले जात आहे. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. पंढरपुरातील यांत्रिक विभागात काम करणा-या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.