धक्कादायक ! एसटी बस चालकाची बसमध्ये गळफास लावून आत्महत्या; संगमनेर डेपोतील घटना

संगमनेर – एसटी बस चालकाने बसमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील संगमनेर बस डेपोमध्ये ही घटना घडली. सुभाष तेलोरे (रा. कोल्हार, ता. पाथर्डी) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. या घटनेने एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.

तेलोरे हे पाथर्डी – नाशिक या बसचे चालक होते. संगमनेर बसस्थानकात डिझेल नसल्याने नाशिकला न जाता संगमनेरला बस मुक्कामी होती. त्यावेळी पहाटेच्या सुमारास त्यांनी कपड्याच्या सहाय्याने बसमध्ये गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. तेलोरे यांच्यावर कर्ज होते. कर्जाचा बोजा वाढत चालला होता. त्यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीत समोर येत आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात धुळ्यातील एसटी कर्मचारी कमलेश बेडसे यांनी अनियमित पगारामुळे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आंदोलनही केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.