#अर्थसंकल्प2019-20 : एसटी महामंडळ विषयीच्या अर्थसंकल्पातील घोषणा

मुंबई : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने 27 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला होता. आता मुनगंटीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. येत्या 2-3 महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे अतिरिक्त अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ संबंधित तरतूद व घोषणा –

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे सार्वजनिक बस वाहतुकीचा कणा मागील 3 वर्षात 129 बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाचे प्रस्ताव असून त्यापैकी 39 कामे पूर्ण. 70 बसस्थानकांची कामे प्रगतीपथावर. या नुतनीकरणाच्या कामाकरीता रु.136 कोटी 51 लाख इतका खर्च

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सध्या असलेल्या बस स्थानकांचे सर्वसोयींनी परिपूर्ण अशा बस स्थानकांत रुपांतरित करण्याचा मानस. याकरिता सन 2019-20 या आर्थिक वर्षात रु. 100 कोटी नियतव्यय राखीव

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मार्ग महामंडळास 700 बस खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय.2018-19 या आर्थिक वर्षात रु.50 कोटी एवढा निधी दिला, सन 2019-20 या आर्थिक वर्षात रु.160 कोटी इतके अनुदान देणार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here