#दिलासादायक | राज्यात सलग 9 व्या दिवशी नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

मुंबई | राज्यात सलग नवव्या दिवशी  कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही नव्या रूग्णांपेक्षा अधिक नोंदवली गेली आहे. राज्यामध्ये आज (16 मे, रविवार)  34 हजार 389 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे तर आज नवीन 59 हजार 318 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 48,26,371 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 4,68,109 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.74% एवढे झाले आहे. राज्यात आज 974 कोरोनाबाधित रूग्णांची मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52 टक्के इतका झाला आहे, अशी देखील माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

#MeechMazaRakshak #COVID19 #maharashtra

मागील 8 दिवसातील महाराष्ट्रातील कोरोना अपडेट :
👇👇👇👇

15 मे 2021

नवे रूग्ण : 34 हजार 848
कोरोनामुक्त : 59 हजार 073
रुग्ण बरे होण्याचा दर : 89.02%

14 मे 2021

नवे रूग्ण : 39 हजार 923
कोरोनामुक्त : 53 हजार 249
रुग्ण बरे होण्याचा दर : 88.68%

13 मे 2021

नवे रूग्ण : 42 हजार 582
कोरोनामुक्त : 54 हजार 535
रुग्ण बरे होण्याचा दर : 88.34%

12 मे 2021

नवे रूग्ण : 46 हजार 781
कोरोनामुक्त : 58 हजार 805
रूग्ण बरे होण्याचा दर : 88.01%

11 मे 2021

नवे रूग्ण : 40 हजार 956
कोरोनामुक्त : 71 हजार 966
रूग्ण बरे होण्याचा दर : 87.67%

10 मे 2021

नवे रूग्ण : 37 हजार 326
कोरोनामुक्त : 61 हजार 607
रूग्ण बरे होण्याचा दर : 86.97%

9 मे 2021

नवे रूग्ण : 48 हजार 401
कोरोनामुक्त : 60 हजार 226
रूग्ण बरे होण्याचा दर : 86.04%

8 मे 2021

नवे रूग्ण : 53 हजार 605
कोरोनामुक्त : 82 हजार 266
रूग्ण बरे होण्याचा दर : 86.03%

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.