मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10 वीची भूगोलची राहिलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याची तारीख 31 मार्च नंतर जाहीर करण्यात येईल. या एकमात्र विषयाची परीक्षा मागे राहिली आहे.
राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, शालेय शिक्षण विभागाने कोरोना संकट लक्षात घेऊन दहावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. याबाबतची तारीख 31 मार्चनंतर जाहीर करण्यात येईल.
विद्यार्थ्यांनी शनिवारी इतिहासाची परीक्षा दिली. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांसाठी मास्क आणि हॅंड सॅनिटायझरची सोय केली होती. दहावीची परीक्षा तीन मार्च रोजी सुरू झाली आहे. महाराष्ट्र सरकारने यापुर्वी पहिली ते आठवीच्या परीक्षा यापुर्वीच रद्द केल्या आहेत. नववी आणि अकरावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.