पुणे (प्रतिनिधी) – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन सुरू आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरनाचे (महारेरा) कामकाज 3 मे पर्यंत बंद केले आहे. याबाबत महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून जगभरामध्ये करोनाने धुमाकूळ घातला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. देशातही सुरुवातीला 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केले होते. मात्र, करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला.
याच धर्तीवर कार्यालयात होणारी गर्दी टाळून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महारेरातर्फे 3 मे पर्यंत कामकाज बंद केले आहे. मात्र, प्रकल्प नोंदणी, एजंट नोंदणी, विस्तार दुरुस्ती कार्य यासारख्या सेवा ऑनलाइन सुरू राहणार आहेत.
दरम्यान 3 मेला लॉकडाऊन संपल्यानंतर 4 मे रोजी महारेराच्या कामकाजाबाबत शासनाच्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद केले आहे. याविषयी रेरा प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. निलेश बोराटे म्हणाले, हा निर्णय जनहिताचा आहे. यामुळे लोक घराबाहेर पडणार नाहीत. सरकारच्या निर्देशांचे पालन करतील. जेणेकरून करोनाच्या संसर्गास आळा बसण्यास मदत