मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान, आजपासून पुढील 4 दिवस म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार ? याबद्दल जाणून घेऊयात…
‘या’ 14 जिल्ह्यात पडणार अति जोरदार पाऊस
राज्यातील मुंबईशहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 14 जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘या’ 16 जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘या’ 6 जिल्ह्यात पडणार मध्यम ते जोरदार पाऊस
6 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे. यामध्ये सांगली, सोलापूर, धाराशिव, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे.