Maharashtra Rain : राज्यात मृत्यूचं तांडव; आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ जणांनी गमावला जीव

मुंबई – मागील तीन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. रायगड, रत्नागिरी, चिपळूण आणि महाड या भागांमध्ये प्रलय आल्यासारखी स्थिती आहे.

तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे.

तर महाड तालुक्यातही तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 89 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिली आहे.

राज्यात आतापर्यंत झाले इतके मृत्यू :

तळीये, महाड – 38 मृतदेह हाती
आंबेघर, सातारा – 13 जणांचा मृत्यू
पोलादपूर, रायगड – 11 जणांचा मृत्यू
वाई, सातारा – 2 महिलांचा मृत्यू
पोसरे, रत्नागिरी -17 जणांचा मृत्यू
कणकवली – दिगवळे, सिंधुदुर्ग – 1 महिलेचा मृत्यू
चिपळूण – कोव्हिड सेंटरमधील 8 रुग्णांचा मृत्यू

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.