Maharashtra Rain । राज्यात सध्या वातावरण पूर्ण बदललेले दिसत आहे. कुठे पाऊस तर कुठं उन्हाच्या झळा लागत आहेत. दरम्यान, यावर्षी आत्तापर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
‘या’ भागात पावसाचा यलो अलर्ट जारी Maharashtra Rain ।
दरम्यान , हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळं राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही कोसळधार Maharashtra Rain ।
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. ला निनामुळं कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे, त्यामुळं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतात जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते आणि सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो.
ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो. देशातील जवळफास निम्मी शेतजमीन ही जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘ला’ निनाच्या प्रभावामुळं यावर्षी मान्सूनचा मुक्काम वाढणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.