Maharashtra Rain । राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या कोकणात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाआहे. त्यासोबतच ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा Maharashtra Rain ।
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील घाट परिसरासाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच घाट परिसर सोडता शहरी भागातही हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता Maharashtra Rain ।
उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातही उद्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भात देखील उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
हेही वाचा
महाराष्ट्र बंद मागे, पण ठिकठिकाणी आज महाविकास आघाडीकडून मूकनिदर्शने