विद्यापीठ अधिनियमात सुधारणा होणार

राज्य शासनाकडून विशेष समिती गठीत

 

पुणे – महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करण्यासाठी आणि उच्च व तंत्र शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य शासनाने विशेष समिती गठीत केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे “यूजीसी’चे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखालील समितीत 13 सदस्यांची निवड झाली आहे.

उच्च शिक्षणातील बदल विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी तसेच विद्यापीठ कायद्यानुसार शिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठात पूरक वातावरण निर्माण करून विद्यार्थी हाच उच्च शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी समिती काम करेल.

नव्या विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी फारशी योग्यप्रकारे होत नाही. तसेच राज्यपाल, लोकप्रतिनिधी व विद्यार्थी संघटनांकडून विद्यापीठाच्या अधिनियमात दुरुस्तीची मागणी होत होती. ही बाब लक्षात घेऊन कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.