मुंबई : 29ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस असल्याने आज सगळ्या पक्षांकडून राहिलेल्या जागांवर उमेदवार घोषित केले जात आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 7 उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.
#MaharashtraElection2024 | NCP-SCP releases another list of 7 candidates… #SharadPawar #NCP
राष्ट्रवादीने (शरदचंद्र पवार गट)7 उमेदवारांची आणखी एक यादी केली जाहीर pic.twitter.com/Ys5CFtvgmj— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 28, 2024
आतापर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 4 याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीमध्ये 45 जणांना उमेदवारी देण्यात आली होती. दुसऱ्या यादीमध्ये 22 उमेदवार जाहीर केले. तसेच तिसऱ्या यादीमध्ये 9 तर आजच्या चौथ्या यादीमध्ये 7 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 83 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
कोणाकोणाला दिली संधी?
माण – प्रभाकर घार्गे
काटोल – सलील अनिल देशमुख
खानापूर – वैभव सदाशिव पाटील
वाई – अरुणादेवी पिसाळ
दौंड – रमेश थोरात
पुसद – शरद मैंद
सिंदखेडा – संदीप बेडसे