मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना – उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांच्यावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शायना एनसी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ते’ वक्तव्य भोवलं
अरविंद सावंत यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना शिवसेना नेत्या शाइन एनसी यांच्यावर निशाणा साधला आणि सांगितले की, त्यांची अवस्था बघा, त्या आयुष्यभर भाजपमध्ये राहिल्या आता दुसऱ्या पार्टीत गेल्या आहेत. इथं ‘इम्पोर्टेड माल’ चालत नाही, फक्त ओरिजनल माल येथे चालतो असे वक्तव्य केले. याच वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
“2014 आणि 2019 मध्ये पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली तुमच्यासाठी काम केले.” एका महिलेला ‘माल’ म्हटल्याने आता ते अडचणीत येणार आहेत. जनता त्यांना जागा दाखवेल, त्यांची विचारधारा स्पष्ट आहे. अरविंद सावंत यांना माफी मागावी लागेल. ही महाविनाश आघाडी आहे. तसेच मी पोलिसांत गुन्हा दाखल करून निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे असे शायना एनसी म्हणाल्या आहेत.