जळगाव – २ जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दलाला 63 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त २ जानेवारीपासून महाराष्ट्र पोलीस दल पोलीस सप्ताह म्हणून साजरा करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू पोलीस कर्मचारी विनोद अहिरे यांनी पोलीस मुख्यालयातील रोड ट्रॅकवर सलग 63 किलोमीटर स्केटिंग केली.
अशा अनोख्या पद्धतीने पोलीस स्थापना दिन साजरा करणारे ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिले पोलीस ठरले आहेत. सदरचे 63 किलोमीटरचे अंतर त्यांनी दोन तास 26 मिनिटांत यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केले.
विनोद अहिरे म्हणाले की, हा माझा आजचा विक्रम मी 26/11 च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले अधिकारी, कर्मचारी तसेच कोरोना महामारी मध्ये शहीद झालेल्या सर्व अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांना अर्पण करीत आहे.