मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी मनसेने आपले 4 उमेदवार घोषित केले आहेत. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाने कागलमधून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी दिली आहे. बाकी पक्ष पण येत्या काही दिवसांत आपले उमेदवार जाहीर करतील. मात्र या सगळ्यात महत्वाचा प्रश्न समोर येतो तो जागावाटपाचा कोणत्या पक्षाला किती जागा भेटणार यावरून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अजून वाद आहे. मात्र आताच हाती आलेल्या माहितीनुसार महायुतीचे कोणत्या पक्षाला किती जागा देणार हे ठरलं आहे.
‘या’ दिवशी करणार अधिकृत घोषणा
महायुतीतील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. 20 ऑगस्टला जागावाटपाची अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. अंबाबाईचे दर्शन घेऊन तिन्ही पक्षाचे नेते जागावाटपाची घोषणा करतील, असे उदय सामंत म्हणाले आहेत.
भाजपने फडणवीसांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. रविवारी झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.