मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी राज्याचा दौरा सुरू केला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याला प्रारंभ केला.
आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांनी आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत संभाजीराजे यांनी मोठे विधान केले. यातच आरक्षणाच्या या मुद्द्यावरून दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापू लागलं आहे.
राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतानाच संभाजीराजेंच्या भूमिकेवर या भूमिकेवर माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली असून त्यांच्यावर आरोप केले आहे.
माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. तुम्हाला जर पवार साहेब व महाविकास आघाडीसोबत हिट संबंध जपायचे असेल तर खुशाल जपा जायचं असेल, तर मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही.’ असं म्हणत त्यांनी राणेंनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली आहे.