धनंजय मुंडेंच्या ‘या’ टिकेवर भाजपचा पलटवार

पुणे – २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपल्या आहेत. यादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात सोशल माध्यमावर आरोप-प्रत्यारोपांचे युध्द पहायला मिळते आहे. दोन्हीही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी वाया घालवत नाही.

सकाळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने टीका केली होती. धनंजय मुंडे यांनी उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो शेअर करत यांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच… केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का? असे कॅप्शन दिले होते.

यांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का ? : धनंजय मुंडे

त्यानंतर काही तासातच भाजपाकडून या टिकेचा समाचार घेण्यात आला आहे. भाजपाने धनंजय मुंडे यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, सत्तेतून बाहेर पडल्यावर कसा जळफळाट होतो ह्याच एक ज्वलंत उदाहरण ! असली सुमार दर्जाची टीका टिप्पणी करुन समाधान मानावं लागतं , कारण भारतीय जनता पार्टीची कामाची घोडदौड विरोधक तसं ही थांबवू शकत नाही म्हणून विरोधकांची असली ही थेरं.

यावरून राज्यात निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले असून जससशा निवडणूका जवळ येतील तसतसे असे अनेक आरोप-प्रत्यारोप पहायला मिळतील असं दिसतं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)