MAHARASHTRA NEWS | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोठं विधान केलं आहे. बाबा सिद्दीकी यांना का मारण्यात आले? याचे मूळ कारण इतके दिसवं उलटूनही समोर न आल्यामुळे त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कोणी म्हणत आहे की, तुरुंगात बसलेल्या एका व्यक्तीने त्यांना मारले तर कोणी म्हणत आहे कि, त्यांचे वयक्तिक भांडण झाले होते त्यामुळे त्यांना मारण्यात आले. पण, प्रश्न असा पडतो की हत्येमागे कोण आहे, कुणाची त्यांची हत्या व्हावी अशी इच्छा होती ? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धुळ्यातील एआयएमआयएमचे उमेदवार फारुख शाह यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करताना असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना बाबा सिद्दीकी यांची हत्या कशी झाली ? असा सवाल उपस्थित केला आहे.
ओवेसी पुढे म्हणाले, ‘बाबा सिद्दिकीची हत्या झाली, गोळ्या झाडल्या, महाराष्ट्रात काय चाललंय, तीन वेळा आमदार राहिलेल्यांना 6 वेळा गोळ्या लागल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस कसे सांगा ? बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी तुमच्या पक्षाचे आहेत तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्याला वाचवू शकत नसाल तर स्वत:ला कसे वाचवाल ? असा सवाल त्यांनी अजित पवार यांना केला.
महाराष्ट्र पोलीस कमकुवत झाले आहेत – ओवेसी
एआयएमआयएम अध्यक्ष म्हणाले की, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर इतके दिवस आरोपीला पकडून दाखवू, असे म्हटले होते. कोणाला अटक करायची, असा सवाल त्यांनी केला. मारेकरी कुठे आहेत? ओवेसी म्हणाले की, प्रत्येक दुस-या दिवशी मीडियामध्ये असे येते की पोलीस तिकडे गेले, पोलीस इकडे गेले. महाराष्ट्र पोलीस अतिशय सक्षम आहेत, गुप्तचर नेटवर्क खूप मजबूत आहे, पण नरेंद्र मोदी सत्तेत आहेत, त्यामुळे ते कमकुवत झाले आहेत. या कमकुवतपणामुळेच अत्याचार होत आहेत.