Election News : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांमध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषद येथील संपूर्ण निवडणुकीसह अनेक ठिकाणच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे. (Election News) पातूर नगरपरिषदेत अध्यक्षपदासह २० सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच उमेदवारांच्या निधनामुळे स्थगित झालेल्या मनमाड, पिंपळनेर, गेवराई आणि अकोट येथील प्रत्येकी एका प्रभागासाठीही मतदान होणार आहे. (Election News) याशिवाय ११ जिल्ह्यांतील १४ नगरपंचायतींमधील १५ रिक्त जागा आणि ३ नगरपरिषदांमधील ३ जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. एकूण १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील ४७ रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. (Election News) निवडणूक वेळापत्रक : निवडणूक कार्यक्रम जाहीर – १२ मे २०२६ उमेदवारी अर्ज दाखल – १८ मे ते २५ मे अर्ज छाननी – २६ मे अर्ज मागे घेण्याची मुदत – २७ मे ते २ जून मतदान – २० जून (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०) मतमोजणी आणि निकाल – २१ जून या निवडणुकांमुळे संबंधित भागांतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून स्थानिक पातळीवर तयारीला वेग आला आहे.