शुकशुकाट! महाराष्ट्रातील ‘या’ भागांत लॉकडाऊन; दुकानांपासून ते रिक्षापर्यंत सर्व काही बंद

वर्ध्यात 36 तासांची संचारबंदी

Maharashtra Lockdown – विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आज रात्रीपासून जिल्ह्यात 36 तासांची कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नंदूरबार, बीड आणि नाशिकच्या चांदवडमध्येही कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असून या काळात दुकानांपासून ते रिक्षापर्यंत सर्व काही बंद राहणार आहेत. या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्यात शनिवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. मार्च महिन्याच्या प्रत्येक विकेंडला ही संचारबंदी होती. तर मागील विकेंडला धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर 36 तासांची संचारबंदी वाढवत 60 तासांची करण्यात आली होती. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या विकेंडला 36 तासांची संचारबंदी राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली.

संचारबंदीच्या कालावधीत वैद्यकीय सेवा वगळता दुकाने, मॉल्स, मार्केट बंद राहतील. या काळात हॉटेल्स, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल्स, खासगी परिवहन सेवा, एसटी, ऑटोरिक्षा सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र जीवनावश्‍यक वस्तूंची सेवा सुरू राहील. दूध डेअरी पहाटे 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहील.

एमआयडीसीतील आस्थापनाही सुरू ठेवण्यात येणार आहे. पेट्रोल पंपदेखील बंद राहणार आहेत, अशी माहिती देशभ्रतार यांनी दिली. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी या संचारबंदीला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.