Maharashtra Kesri । महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा नुकतीच अहिल्यानगर शहरात पार पडली.या स्पर्धेतील निकालानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. निकालाच्या नाराजीवरून राडा झाला.त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी स्वतंत्र कुस्ती स्पर्धा घेण्याची घोषष्ण केली होती. त्यानुसार आता अप्रत्यक्षपणे आमदार रोहित पवारांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला विरोध केला जात आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मल्लांची 3 वर्षांसाठी नोंदणी रद्द Maharashtra Kesri ।
महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने कुस्तीपटूंना पत्र काढून कुस्तीगीर संघाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही संस्थेच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मल्लांची 3 वर्षांसाठी नोंदणी रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. राज्य कुस्तीगीर संघाने जाहीर केलेल्या पत्रात, महाराष्ट्र केसरी किंवा अन्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्याचा हक्क केवळ संघालाच असल्याचा उल्लेख करण्यात आल्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील कुस्तीविश्व दोन गटांत विभागले गेले आहेत.
नक्की प्रकरण काय? Maharashtra Kesri ।
कुस्तीगीर संघाच्या स्पर्धेनंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून स्पर्धा घेण्याची घोषणा झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्याची विनंती केली होती.मार्च महिन्यात कर्जत- जामखेडमध्ये कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धा होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने अप्रत्यक्षपणे आमदार रोहित पवार यांच्या प्रस्तावित कुस्ती स्पर्धेला विरोध दर्शवला आहे. संघाने कुस्तीपटूंना पत्र काढून कुस्तीगीर संघाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही संस्थेच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी न होण्याचे आवाहन केलं.
कुस्तीगीर संघा व्यतिरिक्त कोणत्याही संघटनेला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार नसल्याचा पत्रात उल्लेख… इतरांनाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत सहभागी झाल्यास त्या मल्लांच्या तीन वर्षांसाठी कुस्तीगीर संघात नोंदणी केल्या जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मार्च महिन्यात कर्जत-जामखेड येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र, कुस्तीगीर संघाच्या भूमिकेमुळे या स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत काय वाद झाला होता?
पृथ्वीराज मोहोळकडून पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचाना लाथ मारली आणि स्पर्धेच्या ठिकाणी एकच गोंधळ झाला. पंचांचा निर्णय मान्य न झाल्याने शिवराज राक्षेने हे कृत्य केलं.यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचं दिसून आलं. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले होते.