पुणे : कुस्ती क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुण्यात होणार आहे. यंदा प्रथमच या मानाच्या स्पर्धेत उत्तेजक चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेने दिली आहे.
ही स्पर्धा २ ते ७ जानेवारी दरम्यान पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. स्पर्धेत ४५ संघ सहभागी होणार असून, सुमारे ९०० ते ९५० मल्ल स्पर्धेत कौशल्य पणाला लावणार आहेत.
कुस्तीमध्येही उत्तेजक पदार्थ सेवन केले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या, त्यामुळे यंदाच्या स्पर्धेवेळी स्पर्धकांची उत्तेजक चाचणी करण्यात येणार आहे.