पुणे : कुस्ती क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा येत्या २ ते ७ जानेवारी या कालावधीत प्रथमच पुण्यात होणार आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि सिटी काॅर्पोरेशन यांच्यातर्फे म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेत ४५ संघ सहभागी होणार असून, सुमारे ९०० ते ९५० मल्ल स्पर्धेत कौशल्य पणाला लावणार आहेत.
स्पर्धा माती आणि मॅटवरील प्रत्येकी दहा अशा एकूण २० गटांत होणार आहे. स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून या मल्लांसाठी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.