कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सीमाभागात मराठी भाषिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याने यावर तोडगा काढण्यात आज महाराष्ट्र एकीकरण समितीने समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कोल्हापुरातल्या शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन निवेदन दिले.
एकनाथ शिंदे यांची भेट समितीने घेतली. यावेळी सीमाभागात मराठी भाषिकांवर प्रचंड मोठा अन्याय होत असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे.
तसेच महाराष्ट्र सरकारने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडावी, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यत सीमाभागातील परिस्थिती जैसे ठेवावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र युवा एकीकरण समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे.