IAS Transferred : राज्यातील चार वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कॅबिनेट बैठकीदिवशीच मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
IAS Transferred : राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरूच असून, राज्य सरकारने मंगळवारी प्रशासकीय पातळीवर आणखी एक महत्त्वाचा फेरबदल केला आहे.

IAS Transferred : राज्य सरकारने मंगळवारी चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करत प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचा फेरबदल केला आहे. मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कॅबिनेट बैठकीच्या दिवशीच हा निर्णय घेतला. सायंकाळी सहा वाजता जारी करण्यात आलेल्या आदेशांमध्ये आदित्य जिवाणे आणि अनिता मेश्राम यांच्यासह चार अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. (IAS Transferred)
राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरूच असून, कॅबिनेट बैठकीच्या आसपास मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्याची परंपरा यंदाही कायम असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून विविध विभागांमध्ये प्रशासकीय फेरबदल सुरू आहेत. (IAS Transferred)
या अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर
- डॉ. माधवी खोडे-चावरे (IAS, 2007 बॅच) यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर या पदावरून सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. (IAS Transferred)
- सुनील महिंद्राकर (IAS, 2015 बॅच) यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- अनिता मेश्राम (IAS, 2015 बॅच), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांची आयुक्त, मनरेगा, नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.
- आदित्य जिवाणे (IAS, 2021 बॅच), सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण, छत्रपती संभाजीनगर येथून जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. (IAS Transferred)
गत आठवड्यात ११ IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या
यापूर्वी राज्य सरकारने ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यामध्ये राहुल रंजन महिवाल, रुचेश जयवंशी, अमित रंजन, करिश्मा नायर, श्वेता सिंघल, गीतांजली बाविस्कर, दिलीप जगदाळे, लक्ष्मण राऊत आणि पंकज देवरे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. (IAS Transferred)
राज्य प्रशासन अधिक गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने हे फेरबदल करण्यात आल्याचे मानले जात असून, आगामी काळात आणखी काही महत्त्वाच्या बदल्यांची शक्यता वर्तवली जात आहे. (IAS Transferred)





