महाराष्ट्रात पर्यटन विकास वाढण्यास वाव: सुहास दिवसे

 पर्यटन विकासासाठी उपाययोजना करणार 
मुंबई: पर्यटन हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि वेगाने वाढ होणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रातर्फे भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यात येते. म्हणूनच राज्यातील पर्यटनाचा विकास शाश्वत ठेवण्याच्या उद्दिष्टाने नवे कार्यक्रम आणि धोरणे आखून त्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटन संधी विकसित करून, विश्‍लेषण करून आणि समजून घेण्याकडे मी लक्ष केंद्रीत करणार आहे, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसे यानी सांगीतले. 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे सुहास दिवसे यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात या क्षेत्राच्या विस्तारीकरणाला मोठा वाव आहे. यातून कमी भांडवलात मोठया प्रमाणात रोजगारनिर्मिती होते. त्याचबरोबर खासगी उद्योगही मोठ्या प्रमाणात विकसित होत असतात. व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर सुहास दिवसे यांनी लगेचच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीसाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाचे संचालक आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय सहसंचालक आशुतोष राठोड, एमटीडीसीच्या महासंचालक स्वाती काळे, प्रसिद्धी आणि जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक दनेश कांबळे आणि इतर विभागप्रमुखांचा समावेश होता. त्यांनी एमटीडीसीच्या प्रकल्पांची आढावा बैठकही घेतली. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)