मुंबई – मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे’ यांचे पुण्यात आज निधन झाले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली आहे. काय म्हणाले पवार.. “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, या आशयाचे ट्विट पवार यांनी केलं आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 15, 2021