कोरोनाबाधित रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी ‘महाकवच’ ॲप

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी सरकारनं डिजिटल पाऊल टाकलं आहे. नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल, नाशिक महापालिका, डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (टीसीएस फाऊंडेशन), कुंभेथॉन इनोवेशन फाऊंडेशन, टेक एक्स्पर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल प्लॅटफॉर्म्सची निर्मिती करण्यात आली आहे.

‘नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर’ ही या प्लॅटफॉर्म्सची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ‘महाकवच ॲप’ असं या डिजिटल प्लॅटफॉर्मच नाव आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारंटाइन ट्रॅकिंग अशी याची दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत. राज्यात या ॲपचा प्रभावीपणे वापर करण्यात आला आहे.

या ॲपमुळे कोरोनाबाधित व्यक्तीचा मागील 21 दिवसांचा मागोवा (Location History), कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले हाय रिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्ट्सचे संपर्क क्रमांक, कोरोनाबाधित व्यक्तीने भेट दिलेली सार्वजनिक ठिकाणे म्हणजेच हॉटस्पॉट्सची माहिती कळते. तसेच प्रशासनाला ही सर्व माहिती एकाच ठिकाणी रिअल-टाइम डॅशबोर्डवर दिसते.

याबरोबरच क्वारंटाइन (मॅनेजमेंट) व्यवस्थापनाकरता महाकवच ॲप डाऊनलोड केल्यानंतर जीओ पेन्सिंगमुळे नागरिकांना एका मर्यादित त्रिज्येतच वावरण्याची मुभा असते. जेव्हा ही त्रिज्या नागरिक ओलांडतात तेव्हा ॲपद्वारे ही माहिती लगेच प्रशासनाला समजते. तसेच सेल्फी अटेंडन्स या वैशिष्ट्याद्वारे जेव्हा जेव्हा विचारणा होईल तेव्हा अशा व्यक्तीला सेल्फी काढून तो ॲपद्वारे प्रशासनाकडे पाठवावा लागतो, यामुळे नागरिक फोन घरी ठेवून बाहेर गेल्यास लगेच प्रशासनाला समजते.

महाकवच ॲप हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून ते केवळ करोना लक्षणीत व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या व्यक्तींसाठी आहे. फक्त अशाच व्यक्ती हे ॲप वापरू शकतात. इतर लोकांना मात्र हे ॲप वापरण्याची परवानगी नाही.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.