मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीसाठीची उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. मनसेने निवडणूक रिंगणात जोरदार उडी घेतली आहे. आज मनसेने जाहीर केलेल्या यादीमध्ये एकूण ४५ उमेदवारांचा सहभाग आहे.
यापूर्वी मनसेने 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात कोथरूड, हडपसर, शिवाजीनगर तसेच कसबा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांचा समावेश आहे.
‘महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीसाठीची’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी… pic.twitter.com/yPUlMGFdhb
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 2, 2019