Maharashtra Assembly Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचा महाराष्ट्र दौरा निश्चित झाला असून विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारासाठी पंतप्रधान 8 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येणार आहेत. चार दिवसांत 9 सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
8 नोव्हेंबरला महायुतीची पहिली मोठी सभा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभांचा नारळ फुटणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील प्रचारसभांमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर यांसह विविध ठिकाणांचा समावेश आहे.
चार दिवसात 9 सभा-
नियोजित कार्यक्रमानुसार 8 नोव्हेंबरला धुळे, नाशिक, 9 नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, 13 नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि 14 नोव्हेंबर रोजी संभाजी नगर, नवी मुंबई व मुंबई याठिकाणी मोदींच्या सभा होणार आहेत.
5 नोव्हेंबरपासून उद्धव ठाकरेंचा प्रचार दौरा –
दरम्यान, शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून आपल्या राजकीय प्रचार दौऱ्याला सुरुवात करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांची पहिली निवडणूक प्रचारसभा होईल. त्यानंतर, राज्यभरात त्यांच्या 15 सभा घेतल्या जाणार असल्याची माहिती आहे.