महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने भरला बॅंकांचा थकित हप्ता

पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) आपल्यावर असलेल्या विविध बॅंकांच्या कर्जाच्या 69.53 कोटी रूपयांच्या थकित रकमेपैकी 23.52 कोटींचा हप्ता बुधवारी भरला. गहुंजे येथील एमसीएच्या स्टेडियम उभारणीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत न भरल्याने नोव्हेंबर 2018 मध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्रने स्टेडियमचा प्रतिकात्मक ताबा घेतला होता. बीसीसीआयने एमसीएला निधी दिल्यावर तत्काळ बॅंकांचे हप्ते भरण्यात आले. आता विविध बॅंकांचे मिळून सुमारे 46 कोटींचे कर्ज एमसीएवर शिल्लक आहे.

यासंदर्भात बोलताना एमसीएचे सचिव रियाझ बागवान म्हणाले, येत्या 2 महिन्यांत बॅंक ऑफ बडोदा आणि कर्नाटक बॅंकेचे संपूर्ण कर्ज फेडले जाईल. त्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि आंध्र बॅंकेचे कर्ज शिल्लक असेल. त्याचे हप्तेही वेळेत भरण्याला आमची प्राथमिकता असेल. बीसीसीआयकडून एमसीएला सुमारे 81 कोटी रूपये येणे आहेत. त्यातून हे हप्ते भरले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.