मुंबई, दि. 14 – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अचानक मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिपंकर दत्ता यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तथापि ही एक सदिच्छा भेट होती असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री व मुख्य न्यायाधीश दोन-तीन महिन्यांतून एकमेकांना भेटत असतात, असेही काही सूत्रांनी म्हटले आहे. दोघांमध्ये यावेळी सुमारे तासभर चर्चा झाली. सध्या कोर्टाला उन्हाळी सुट्टी असली तरी मुख्य न्यायाधीश दत्ता हे कोविडच्या संबंधातील केसेसची सुनावणी घेत आहेत.
कोविडमुळे प्रत्यक्ष सुनावणी सध्या बंद असली तरी ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतली जात आहे. दरम्यान, दोघांमधील चर्चेचा तपशील समजला नाही. सध्या अनिल देशमुख, परमवीर सिंग, वाझे या प्रकरणांचीही हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.