मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाहीर सभा होत आहे. असं असताना मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री सहकुटुंब पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांतील राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही शिवतीर्थावरील तिसरी भेट आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे उपस्थित होते.
Mumbai: Maharashtra CM Eknath Shinde meets MNS Chief Raj Thackeray at his residence Shivtirth. pic.twitter.com/uBx92ACM42
— ANI (@ANI) March 26, 2023
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब रविवारी सायंकाळी पोहचले. मागील काही दिवसांत घडलेल्या राजकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Madhya Pradesh Politics : मध्य प्रदेशात आता 200 पार जागांचे लक्ष्य – जे.पी. नड्डा
दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत महिममध्ये समुद्रात तयार झालेल्या अनधिकृत बांधकामाचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला होता. यावेळी त्यांनी सरकारने हे अनधिकृत बांधकाम त्वरित हटवावे, असे आवाहन केले होते. यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत सरकारने मुंबई महापालिकेला निर्देश देऊन हे अनधिकृत बांधकाम हटवले होते. यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.