Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून, मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पक्षातील दोन बड्या मंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. Maharashtra Politics नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची नावे समोर आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. विशेषतः आमदार दीपक केसरकर यांच्यावरही आरोप होत असल्याने राजकीय दबाव वाढला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या २०२६ च्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळेही नाराजी वाढली आहे. काही जिल्ह्यांत पक्षाची घसरलेली ताकद लक्षात घेता शिंदे हे मंत्रिमंडळात बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, खरात प्रकरणामुळे आधीच रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षातील पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांची चौकशीही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Maharashtra Politics Maharashtra Politics : मोठी बातमी..! एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात ‘भाकरी’ फिरवणार? अशोक खरात प्रकरणामुळे 2 मंत्र्यांची खुर्ची धोक्यात विरोधकांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली असून, संबंधित मंत्री आणि नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनीही सोशल मीडियावर टीका करत पुढचा नंबर कोणाचा, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावरही आरोप केले आहेत. मात्र गोऱ्हे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. Maharashtra Politics या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली असून, पुढील काही दिवसांत याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. Maharashtra Politics