HSC Result 2018 Live Updates :बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी

पुणे  : राज्य मंडळाने अधिकृतरित्या जाहीर केल्याप्रमाणे बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. निकाल लागण्यापूर्वी बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. त्यात त्यांनी निकालाची आकडेवारी जाहीर केली. मागच्या वर्षी ८९.५० टक्के निकाल लागला होता तर यंदा ८८.४१ टक्के निकाल लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी- मार्च २०१८ मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमध्ये सुमारे दोन हजार ८२२ परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी परीक्षा होती. त्यापैकी विज्ञान शाखेचा निकाल ९५. ८५ टक्के लागला असून वाणिज्य आणि कला शाखेचा निकाल अनुक्रमे ८९.५०टक्के , ७८.९३ टक्के इतका लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

HSC Result 2018 : निकाल पाहण्यासाठी ‘ही’ आहेत संकेतस्थळे

Live Updates :

गत वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल घसरला

एकूण निकालाचे प्रमाण 88. 41 टक्के

विभागनिहाय टक्केवारी-
कोकण – ९४.८५
पुणे – ८९.५८
नागपूर – ८७.५७
औरंगाबाद – ८८.७४
मुंबई – ८७.४४
कोल्हापूर – ९१.००
अमरावती – ८८.०८
नाशिक – ८६.१३
लातूर – ८८.३१

शाखानिहाय निकाल-
विज्ञान – ९५.८५
कला – ७८.९३
वाणिज्य – ८९.५०
व्यवसाय अभ्यासक्रम – ८८.४१

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)