आज मुंबईत भाजपच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक

मुंबई – सध्या महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. शिवसेना भाजपला 50-50चा फॉर्म्यूल्याची आठवण करून देत आहे, मात्र भाजपने यावर अजून कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईत भाजपच्या महाराष्ट्रातील नवनिर्वाचीत आमदारांची बैठत विधानभवनामध्ये होणार आहे.

या बैठकीनंतर भाजपची पुढील भूमिका स्पष्ट होईल. भाजप शिवसेनेच्या 50-50 या फॉर्म्युल्याचा विचार करणार की आणखी काही निर्णय घेणार हे लवकरच आता स्पष्ट होईल. दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी चर्चा करताना सांगितल की पुढील मुख्यमंत्री मीच होणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होईल याकडे लक्ष लागून आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. यामुळे सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांना युती करणे भाग आहे. त्यात शिवसेना सत्तेमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. तर भाजपने मात्र आमचं ठरलंय याला स्पष्ट नकार दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.