महाराष्ट्र बॅंकेला दुसऱ्या तिमाहीत नफा

बॅंकेची आर्थिक परिस्थिती भक्‍कम होऊ लागली

पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळाने दुसऱ्या तिमाही आणि अर्धवर्ष अखेरीचे आर्थिक निकाल नुकतेच जाहीर केले. दुसऱ्या तिमाहीत बॅंकेचा निव्वळ नफा वाढून तो 114 कोटी रुपये झाला आहे.

गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत 27 कोटी रुपयांच्या तुलनेत हा नफा झाला आहे. या तिमाहीत व्याजावरील उत्पन्न वाढून ते 2900 कोटी रुपये झाले आहे. ही वाढ गतवर्षीच्या याच काळातील उत्पन्नाच्या 4.02 टक्‍क्‍याने अधिक आहे. दुसऱ्या तिमाही समाप्तीस व्याजेत्तर उत्पन्न 395 कोटी रुपये इतके झाले आहे. 30 सप्टेंबर 2019 च्या दुसऱ्या तिमाही समाप्तीस कार्यान्वयन नफा 751 कोटी रुपये इतका झाला आहे.

30 सप्टेंबर 2019 या अर्धवर्ष अखेरीस बॅंकेचा निव्वळ नफा वाढून तो 195 कोटी रुपये झाला आहे. ही वाढ गतवर्षीच्या अर्धवर्ष 30 सप्टेंबर 2018 अखेरीस झालेल्या 1092 कोटी रुपये तोट्याच्या तुलनेत आहे. गतवर्षीच्या अर्धवर्ष 30 सप्टेंबर 2018 च्या तुलनेत व्याजावरील उत्पन्नामध्ये 30 सप्टेंबर 2019 या अर्धवर्ष अखेरीस 4.50 टक्‍के वाढ होवून व्याजावरील उत्पन्न रुपये 5,672 कोटी झाले आहे.

30 सप्टेंबर 2018 या अर्धवर्ष अखेरीस झालेल्या 1,264 कोटी रुपये कार्यान्वयन नफ्याच्या तुलनेत 30 सप्टेंबर 2019 या अर्धवर्ष अखेरीस झालेला कार्यान्वयन नफा वाढला असून तो रुपये 1,410 कोटी झाला आहे. ही वाढ 11.51 टक्‍के आहे. बॅंकेच्या एकूण व्यवसायामध्ये वाढ झालेली असून 30 सप्टेंबर रोजी एकूण व्यवसाय 2,32,846 कोटी रुपये झाला.

30.09.2018 रोजी एकूण व्यवसाय 2,26,068 कोटी रुपये होता. 30.09.2019 रोजी बॅंकेच्या एकूण ठेवींमध्ये वाढ झालेली असून या ठेवी 1,41,440 कोटी रुपये आहेत. 30.09.2018 रोजीच्या 1,35,525 कोटी रुपयांच्या तुलनेत असून वार्षिक आधारावरील ही वाढ 5,913 कोटी रुपये (4.36%) आहे.

कासा ठेवी (बचत आणि चालू खात्यांमधील ठेवी) वाढून त्या 68,212 कोटी रुपये झाल्या आहेत. यामध्ये 5,537 कोटी रुपये इतकी वाढ झाली आहे. 30.09.2018 रोजी याच ठेवी 62,674 कोटी रुपये इतक्‍या होत्या. वार्षिक आधारावरील ही वाढ 8.84 टक्‍के आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.