नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्ज पुरवठ्यात एप्रिल ते जून या तिमाहीत 15.36 टक्क्याची वाढ होऊन या बँकेने या कालावधीत 2.41 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला आहे.
गेल्या वर्षी या तारखेपर्यंत बँकेने कर्ज पुरवठा केलेल्या केलेली रक्कम 2.09 लाख कोटी रुपये होती. ही माहिती बँकेने शेअर बाजारांना कळविली आहे. याच कालावधीमध्ये पुणे येथे मुख्यालय असलेल्या या बँकेतील ठेवी 14.08 टक्क्यांनी वाढून ठेवीचे रक्कम 3.09 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ही रक्कम 2.67 लाख कोटी रुपये होती.
कर्जपुरवठा आणि ठेवीमध्ये झालेली वाढ पाहता या कालावधीत बँकेचा एकूण व्यवसाय 14.64 टक्क्यांनी वाढून 5.46 लाख कोटी रुपयांवर गेला आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 30 जून 2024 रोजी 4.67 लाख कोटी रुपये होती. आगामी काळातही बँकेचा एकूण व्यवसाय वाढत राहण्याची शक्यता या बँकेने व्यक्त केली आहे.