महाराष्ट्र बॅंकेची कालचक्र कर्ज व्यवस्थापन प्रणाली

पुणे – देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ महाराष्ट्रने व्यवसायांसाठी कर्जाच्या संपूर्ण मुदतीच्या व्यवस्थापनाची प्रणाली (एलएलएमएस) विकसित केली आहे. यामुळे कर्जमंजुरी स्वयंचलित होणे हा व्यवसायात रूपांतर घडवणारा बदल आहे. 

बॅंकेचे कर्जवितरण डिजिटल करण्याच्या बॅंकेच्या उपक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव यांनी बॅंकेच्या प्रमुख कार्यालयामध्ये ही प्रणाली संचालित केली. बॅंकेचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा व नागेश्‍वर राव वाय, तसेच बॅंकेच्या प्रमुख कार्यालयातील सरव्यवस्थापक व इतर कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी राजीव यांनी सांगितले की या प्रणालीमुळे कामकाजाचा खर्च कमी होईल, कर्जाच्या प्रक्रियेमधील वेळेची बचत होईल, कर्ज प्रकरणांच्या छाननीचा दर्जा सुधारेल आणि ग्राहक संपर्क वाढून कर्ज वितरणातील अडचणी दूर होतील यापुढे बॅंकेचे ग्राहक त्यांची कर्ज मागणी ऑनलाइन पद्धतीने करू शकतील व त्यांना त्यांच्या अर्जाचा मागोवा रिअल टाईममध्ये घेता येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.