पुणे – सार्वजनिक क्षेत्रातील देशातील जुनी, बॅंक ऑफ महाराष्ट्रने रिटेल (किरकोळ) आणि एमएसएमई (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) कर्जे दिनांक 1 ऑक्टोबरपासून भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या बाह्य बेंचमार्क स्वरूपात रेपो रेटशी जोडण्याची घोषणा केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना बाह्य बेंचमार्क जसे की रेपोबरोबर आपल्या कर्जांना जोडणे (लिंक करणे) आवश्यक केले आहे. जेणेकरून याद्वारे कमी झालेल्या व्याजदराचा फायदा कर्जदारांपर्यंत त्वरित पोहोचू शकेल. बाह्य बेंचमार्क आधारित कर्जांवर भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दिनांक 04 सप्टेंबरच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बॅंक ऑफ महाराष्ट्रने सर्व नवी फ्लोटिंग दराची कर्जे, रिटेल (किरकोळ कर्जे विभाग) आणि एमएसएमई (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) कर्जांना आरबीआय पॉलिसी रेपो दराने लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे, जो की दिनांक 01 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
या व्यतिरिक्त बॅंक ऑफ महाराष्ट्रने रेपो दराला लिंक करण्यासाठी मध्यम उद्योगांनाही सामील केले आहे आणि आता एमएसएमई (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) यातील सर्व विभागांना याचा लाभ होईल. बॅंकेद्वारा रेपो दरास रिटेल आणि एमएसएमई (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) कर्जांना लिंक करून व्याजदराचा सरळ फायदा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे.