महाराष्ट्र बॅंकेच्या कर्जावरील व्याजदरात घट

जून्या आणि नवे कर्ज घेणाऱ्यांना लाभ

पुणे – देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी असलेल्या महाराष्ट्र बॅंकेने विविध कालावधीतील आपले बेंचमार्क व्याजदर अर्थात एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट फंडींग बेसड्‌ रेटस्‌) कमी केले आहेत. 8 ऑक्‍टोबर 2019 पासून विविध कालावधीतील सर्व एमसीएलआर सध्याच्या व्याजदरापेक्षा 0.10 टक्‍क्‍याने कमी केले आहेत.

बॅंकेचा एक वर्षासाठीचा एमसीएलआर 8.40 टक्‍के असून हा बाजारपेठेच्या सद्यस्थितीत अत्यंत स्पर्धात्मक व्याजदर आहे. इतर सर्व कालावधीतील म्हणजे ओव्हरनाईट, एक महिना, तीन महीने आणि सहा महिन्याचा व्याजदर अनुक्रमे 8.05%, 8.15%, 8.20% आणि 8.30% असा आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकद्वारे कमी केलेल्या रेपोदराशी साधर्म्य राखत रिटेल आणि एमएसएमई कर्जदारांसाठी रेपो लिंकड्‌ कर्जावरील व्याजदर (आरएलएलआर) 0.25 टक्‍क्‍यांनी कमी केला आहे. यामुळे रिटेल आणि एमएसएमईसाठी कर्ज घेणाऱ्याचा मोठा फायदा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.