महाराष्ट्र बॅंकेकडून पोलिसांत तक्रार

पुणे – व्हाटसऍप, बातम्यांच्या वेबसाईट्‌स आणि इतर समाज माध्यमांतून बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबाबत चुकीची माहिती आणि अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिस सायबर सेलमध्ये बॅंकेने आज पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

ही तक्रार विविध समाज माध्यमांवर बॅंक ऑफ महाराष्ट्रची प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरुद्ध आणि नुकसान करणाऱ्याविरुद्ध केली गेली आहे. अशा सर्व बातम्यांचे पोर्टल आणि संबंधित ट्विटर हॅंडलची माहिती तक्रारीच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्याना दिली आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रनी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, या चुकीच्या महितीच्या मूळ स्त्रोताचा शोध घ्यावा आणि या कृत्यासाठी जबाबदार व्यक्तींच्या विरोधात कठोरातील कठोर कारवाई करावी. बॅंकेचे भांडवल उत्तम आणि नियमाप्रमाणे पुरेसे असून बॅंकेला 27 दशलक्षपेक्षा अधिक निष्ठावान ग्राहकांचा आधार आहे तसेच ही बॅंक दिवसेंदिवस अधिक सुदृढ़ होत आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या बाबतीत अदृश्‍य वाईट हेतूनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमजाचे वातावरण निर्माण होवू शकते. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले वृत्त कदापीही खरे नाही तसेच वास्तविकता न जाणून घेता यामध्ये निष्कर्ष महाराष्ट्र बॅंकेकडून पोलिसात तक्रार काढले गेले आहेत.

पूर्वीचा म्हणजे आधी झालेला तोटा आणि लेखा (अकाउंट्‌स) आपल्या राखीव ठेवींमधुन समायोजित करण्यासाठी बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेकडे संपर्क साधला आहे. अर्थात असे जरी बॅंकेने केले नाही तरीदेखील बॅंकेची आर्थिक स्थिती स्थिर, अखंडित आणि मजबूतच राहील. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या स्थितीला कोणत्याही अशा इतर अडचणीत आलेल्या बॅंकेसारखे दाखवणे आणि अडचणीत आलेल्या बॅंकेशी तुलना करून भारतीय रिझर्व्ह बॅंकेद्वारे रिऍलिटी सेक्‍टर फसवणुकीच्या आधारावर बॅंकेवर कारवाई केली जाण्याची बातमी हा एक दुष्प्रचार असून तो चुकीचा आहे. फसवणुकीच्या संबंधित बातमी मध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या सहभागीत्वाचे उल्लेख केलेले आकडे भ्रामक आणि चुकीचे आहेत. रिऍलिटी सेक्‍टर कंपन्यांमध्ये आमच्या बॅंकेचे कर्ज (एक्‍स्पोजर) खूप कमी आहे आणि यामुळे बॅंकेच्या ताळेबंदावर आणि नफ्यावर खुपच कमी परिणाम होईल.

बॅंक आपल्या सर्व सन्माननीय हितधारकांच्या हिताचे रक्षण करण्यास वचनबद्ध आहे तसेच दुराचारी तत्वांविरुद्ध तसेच समाजात भीतीचे वातावरण पसरवणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची शपथ घेत आहे. बॅंकेवर त्यांच्या ग्राहकांचा पूर्ण विश्‍वास असून सर्व ग्राहकांना बॅंक असे आवाहन करत आहे की, भ्रामक आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांपासून सावध असावे तसेच बॅंक ऑफ महाराष्ट्र आपली आर्थिक स्थिती पूर्णरूपाने सुरक्षित आणि अतिशय उत्तम असल्यामुळे सर्व ग्राहकांना निश्‍चिंत रहाण्याची खात्री देते, असे बॅंकेने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.